वसईत पर्यटनबंदी झुगारून पर्यटकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत पर्यटनबंदी झुगारून पर्यटकांची गर्दी
वसईत पर्यटनबंदी झुगारून पर्यटकांची गर्दी

वसईत पर्यटनबंदी झुगारून पर्यटकांची गर्दी

sakal_logo
By

विरार, ता. १७ (बातमीदार) ः कोरोनामुळे दोन वर्षे घरात बसावे लागल्यामुळे पर्यटकांचे पाय आता प्रेक्षणीय स्थळांकडे वळू लागले आहेत. पण पावसाळ्यात धोकादायक ठरणाऱ्या वसईतील पर्यटनस्थळावर जाण्यास पोलिस प्रशासनातर्फे बंदी घालण्यात आली आहे. तरीही बंदीचा आदेश झुगारून पर्यटकांनी तुंगारेश्वर आणि चिंचोटी येथे गर्दी केल्याचे चित्र शनिवार आणि रविवारी दिसून आले. तालुक्यातील सर्वाधिक दुर्घटना या याच दोन ठिकाणी होत असल्याने या भागात पर्यटकांना मज्जाव करण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करावे अशी मागणी समोर येत आहे. तर दुसरीकडे नागरिकांनी देखील खबरदारी घेऊन पर्यटन बंदीचे आदेश पाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पावसाळा सुरु झाल्यानंतर वसईतील समुद्र किनारे, धबधबे, धरणे आणि इतर पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून जातात. मात्र, या ठिकाणी पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे दरवर्षी पालघर जिल्ह्यात पर्यटन बंदी लागू करण्यात येते. यंदा पालघर जिल्ह्यात प्रशासनातर्फे पर्यटनास बंदी लागू करण्यात आली नसली तरी मिरा-भाईंदर, वसई -विरार पोलिस आयुक्तालयातर्फे १४ जुलै ते २८ जुलै दरम्यान वसई विरारसह मिरा भाईंदरमध्ये पर्यटनक्षेत्राच्या १ किलोमीटर परिसरात पर्यटन बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, तरीही शनिवारी बंदीचा आदेश झुगारून पर्यटकांची पर्यटनस्थळी गर्दी दिसून आली. मुंबई, ठाणे आणि पालघरला जवळ असल्याने तुंगारेश्वर व चिंचोटी धबधबा येथे पर्यटकांचा जास्त वावर असतो. वर्षा सहलीबरोबरच जंगल सफरीचा अनुभव मिळत असल्याने अनेक हौशी पर्यटक येथे येत असतात.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89364 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..