लिफ्ट मधून पडून महिलेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लिफ्ट मधून पडून महिलेचा मृत्यू
लिफ्ट मधून पडून महिलेचा मृत्यू

लिफ्ट मधून पडून महिलेचा मृत्यू

sakal_logo
By

पेण, ता. १७ (वार्ताहर) : पेण शहरातील रामवाडी येथील रॉयल गार्डील या इमारतीच्या लिफ्ट मधून पडून महिलेचा मृत्यू होण्याची घटना रविवारी दुपारी घडली. रॉयल गार्डील या इमारतीमध्ये भाडेकरू म्हणून राहणाऱ्या संगीता संदीप केळसकर (वय ४९) या इमारतीमधील लिफ्टने खाली येत असताना लिफ्ट पाचव्या मजल्याच्या लिफ्ट दरम्यान आली असताना अचानक बंद पडली. यावेळी संगीता केळसकर यांनी लिफ्टचा दरवाजा उघडून पाचव्या मजल्यावर उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचा तोल जाऊन खाली पडून त्यांचा जागीच मृत्यू होण्याची घटना घडली. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधिकारी हे करत आहेत. या बाबत दोषी आढळणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89365 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top