
शिवसैनिकांना त्रास दिल्यास जशास तसे उत्तर मिळेल ः रुपेश म्हात्रे
खर्डी, ता. १७ (बातमीदार) ः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचाराशी एकनिष्ठ, प्रामाणिक राहणाऱ्या शिवसैनिकांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशाच तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे भिवंडी लोकसभेचे संपर्कप्रमुख रूपेश म्हात्रे यांनी दिला. शहापूर येथे शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही कायम राहणार असल्याची ग्वाही शहापूर तालुक्यातील उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी युवा सेनानेते आदित्य ठाकरे यांची शहापुरात मार्गदर्शन सभा होणार असून त्यात बंडखोर पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
शहापुरातील तळागाळातील प्रामाणिक व एकनिष्ठ शिवसैनिक आजही आपल्यासोबत असून जे गेलेत त्यांचा विचार न करता आपण एकजुटीने पुन्हा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहू, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे यांनी या वेळी केले. या वेळी उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, उपनगराध्यक्ष विजय भगत, संतोष शिंदे, गणेश राऊत, विठ्ठल भगत, मंजुषा जाधव, चंद्रकांत जाधव, नागेश घुमरे, रवी लकडे, बाळा धानके यांच्यासह तालुक्यातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89367 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..