गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप
गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप

गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १८ (बातमीदार) ः गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी श्रीरूप संदेश फाऊंडेशनमार्फत सत्कर्म फाऊंडेशनच्या वतीने व मानव कल्याण सेवा संघ यांच्या सहकार्याने साकीनाका येथील सावित्रीबाई फुले शाळेत वह्यावाटप करण्यात आले. या वेळी शाळेच्या संचालिका ज्योती राजेश सुभेदार, मुख्याध्यापिका रजनी कोंगे, शिक्षक हणमंत कणसे, प्रकाश इंदूलकर, सत्कर्म फाऊंडेशनचे संचालक दत्तात्रय सावंत आदी उपस्थित होते.
सत्कर्म फाऊंडेशनचे संचालक दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते वह्या वितरीत करण्यात आल्या. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सावंत यांनी शाळेच्या जुन्या आठवणी सांगितल्या. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करणे, हा उद्देश ठेवून फाऊंडेशन कार्य करत असल्याचे सावंत यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89384 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..