कसारा घाटात रस्ता खचला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसारा घाटात रस्ता खचला
कसारा घाटात रस्ता खचला

कसारा घाटात रस्ता खचला

sakal_logo
By

खर्डी, ता. १८ (बातमीदार) : गेले १० दिवस सतत कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील रस्त्याला तडे गेल्याने रस्ता खचला आहे. घाट मार्गावर असलेले खड्डे, डोकावत असलेल्या दरडी आणि फुटलेले संरक्षण कठडे हे अपघाताला कारणीभूत ठरण्याची शक्यता असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार याबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने येथे प्रवाशांचा नाहक बळी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर दोन वर्षांपूर्वी कसारा घाट रस्ता चार फूट रुंद आणि पाच फूट खोल खचला होता. त्या वेळी जवळपास महिनाभर घाटमार्ग बंद ठेवण्यात आला होता, परंतु पुन्हा त्याच ठिकाणी रस्त्याला तडे गेल्याने ठेकेदाराच्या दर्जाहीन कामाच्या पद्धतीची पोलखोल झाली. पावसाळा झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल कंपनी व एका ठेकेदाराकरवी कोट्यवधी रुपये खर्च करून तडा गेलेला रस्ता व खचलेल्या भागाची दुरुस्ती करून घेतली, परंतु याही वर्षी जुन्या कसारा घाटात रस्त्याला तडे गेले आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी ज्या ठिकाणी रस्त्याला तडे गेले होते व खचले होते त्याच ठिकाणी रास्त्याला मोठे तडे गेले असून ५०० मीटरच्या अंतरावर अनेक ठिकाणी रस्त्याला तडा गेला आहे.
एकेरीच वाहतूक सुरू ठेवणे गरजेचे
कोसळणारा पाऊस व वाहनांच्या कंपनामुळे महामार्गांवरील रस्ता जास्त प्रमाणात खचण्याची शक्यता असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तडा गेलेल्या व खचलेल्या रस्त्यावर उपाययोजना करून एक किमी रस्त्यावर एकेरीच वाहतूक सुरू ठेवणे गरजेचे आहे; अन्यथा दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
---
कोट
ज्या ठिकाणी रस्त्याला तडे गेलेत ते भरण्यात आले आहेत. यापुढे अशी घटना घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाईल.
दिलीप पाटील, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय प्राधिकरण विभाग, नाशिक
कोट
दरवर्षी एकाच ठिकाणी रस्ता खचत असल्याने सरकारने यावर वारंवार खर्च करण्यापेक्षा एकदाच कायमस्वरूपी तोडगा काढून येथील रस्ता दुरुस्त करून प्रवास सुखकर होण्यासाठी प्रयत्न करावेत.
अस्लम शेख, वाहन चालक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89386 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top