पाणी आले मात्र दूषित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी आले मात्र दूषित
पाणी आले मात्र दूषित

पाणी आले मात्र दूषित

sakal_logo
By

वसई, ता. १८ (बातमीदार) ः धरणे जरी भरली असली तरी मात्र गेल्या आठवड्यात विद्युत संकटामुळे पाण्याचा पुरवठा झाला नाही. आता पाणी वितरित करण्यात येत आहे; मात्र कमी व अनियमित असल्याने पाणीटंचाई कायम आहे. अशातच गढूळ, दूषित पाणी येत असल्याने नागरिकांना महागड्या टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.
वसई-विरार महापालिकेला सूर्या, धामणी, उसगाव व पेल्हार धरणांतून पाणीपुरवठा होतो. पावसाचा जोर अधिक असताना जुलै महिन्याच्या १० ते १३ तारखेपर्यंत पम्पिंग स्टेशन येथे वारंवार वीजपुरवठ्यात बिघाड होत होता, त्यामुळे अनियमित पाणी नागरिकांना मिळत होते. अशातच १४ जुलै रोजी वीजपुरवठाच खंडित झाल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला. त्यानंतर दोन ते तीन दिवस पाणी कमी दाबाने सोडण्यात आले, परंतु पावसामुळे दूषित पाणी नळाला येऊ लागले आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून नागरिक महागड्या पाण्याच्या बाटल्या किंवा टँकर मागवत आहेत.
महापालिकेच्या हद्दीत नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यातच मागणीप्रमाणे पाण्याचा पुरवठा होत नाही व सध्या पाणी जरी कमी दाबाने किंवा अनियमित येत असले, तरी ते पिण्यायोग्य नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. लहान मुले, ज्‍येष्ठ नागरिक, रुग्ण यांसह सर्वसामान्य नागरिकांना साथीच्या आजरांचा सामना करावा लागू शकतो, म्हणून अनेक गृहसंकुलांत पिण्याचे पाणी टँकरने मागवावे लागत आहे. यासाठी १४०० ते १५०० रुपये मोजावे लागत आहेत. त्‍यामुळे लवकरात लवकर शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

चारपाच दिवस पाणी आले नाही. त्यात सध्या अनियमित पुरवठा होत असून दूषित पाणी येत आहे. त्यामुळे साथीचे रोग डोके वर काढू शकतात. टँकरने पाणी मागवावे लागत आहे. महापालिकेने गांभीर्याने लक्ष घालून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
- महेश सरवणकर, उपाध्यक्ष, वसई, भाजप

एकीकडे नळजोडण्यांसाठी अर्ज करूनदेखील कार्यवाही झाली नाही. त्यातच काही दिवस पाणी नव्हते. आता येणारे पाणी हे पिण्यायोग्य नाही.
- जयेंद्र भोईर, नागरिक, गावराईपाडा

विजेमुळे गेल्या आठवड्यात पाणी वितरणावर परिणाम झाला होता; मात्र सध्या नऊ प्रभागांत पाणी सुरळीत आहे. ज्या ठिकाणी दूषित, गढूळ पाणी आहे, त्याची चाचपणी संबंधित विभागाला करण्याच्या सूचना देण्यात येतील.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, महापलिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89395 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..