यंत्राद्वारे भातशेती लागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंत्राद्वारे भातशेती लागवड
यंत्राद्वारे भातशेती लागवड

यंत्राद्वारे भातशेती लागवड

sakal_logo
By

कासा, ता. १८ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यात गेल्या आठ ते १० दिवस मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भातलावणीच्या कामाचा खोळंबा झाला. रोपांची पूर्ण वाढ झाली होती, पण पाऊस उसंत देत नव्हता. सध्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिल्याने शेतकरी पुन्हा भातलावणीच्या कामात लागला आहे. कृषी विभाग डहाणू यांच्यामार्फत डहाणू पंचायत समितीच्या सभापती स्नेहलता सातवी यांच्या वाघाडी येथील गावात आधुनिक यंत्राद्वारे भातशेती लावणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले व मार्गदर्शन करण्यात आले.
सध्‍या वाढती महागाई, मजुरांची कमतरता, बी-बियाणे, खते, रोगराई, अवेळी पाऊस; तर कधी मुसळधार पाऊस यामुळे भातशेती करण्यास कोणी धजावत नाही. कृषी विभागामार्फत अनुदानित बी- बियाणे, आधुनिक पद्धतीने रोपे तयार करणे, यंत्राद्वारे लागवड करणे, रोगराईवरील उपाय याबाबतीत नेहमीच मार्गदर्शन मिळत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा आधार मिळत आहे.
यंत्राद्वारे भातलागवडीचे मार्गदर्शन कृषी सहायक अजय आंबेकर यांनी केले. या वेळी कृषी पर्यवेक्षक संदीप संख्ये, मंडळ कृषी अधिकारी सुनीता सरगर, तालुका कृषी अनिल नळगुरवार यांचे सहकार्य मिळाले. या वेळी सभापती स्नेहलता सातवी व अनेक शेतकरी तसेच बचत गटांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

डहाणू तालुक्यात प्रथमच वाघाडी येथे आधुनिक यंत्राद्वारे भातलावणीचा प्रयोग केला आहे. प्रशासनातर्फे या यंत्रासाठी एक लाख ३० हजार अनुदान मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा आणि सुलभ शेती करावी.
- स्नेहलता सातवी, सभापती पंचायत समिती, डहाणू

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89398 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..