वाहतूक पोलिस म्हणजे देव माणूस ..... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक पोलिस म्हणजे देव माणूस .....
वाहतूक पोलिस म्हणजे देव माणूस .....

वाहतूक पोलिस म्हणजे देव माणूस .....

sakal_logo
By

पावसाच्या पाण्यातून जनावरांसहित नागरिकांना बाहेर काढले
कल्याण, ता. १९ (बातमीदार) ः वाहतूक पोलिस म्हटले की रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहनचालकांकडून दंड वसूल करणे, अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते; मात्र हे वाहतूक पोलिस वेळप्रसंगी पावसाच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना, जनावरांना बाहेर काढत जीवनदान देत जणू देवमाणूस ठरत असल्याचा प्रत्यय कल्याणकरांना आला.
शहरातील अर्धवट रस्त्याची कामे आणि त्यात बेशिस्त वाहनचालक यांच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करताना वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे. वेळप्रसंगी दंड आकरणारे वाहतूक पोलिस पावसाळ्यात जणू देवमाणूस असल्याचे दिसून आले आहे.

काय घडले त्‍या दिवशी?
बुधवार, १३ जुलैच्‍या मुसळधार पावसाने खाडीकिनारी असलेल्या गोविंदवाडी बायपास रोडची पूर्ण चाळण झालेली आहे. यासंदर्भात कल्याण पश्चिम वाहतूक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांच्या पथकाने प्रशासनाला वारंवार पत्र लिहिले आहे. दरम्‍यान, बुधवारी पावसामुळे खाडीकिनाऱ्याच्‍या गोठ्यात पाणी आल्याने सर्व म्हशी रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. तसेच गोविंदवाडी रेतीबंदर भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथेही नागरिक व जनावरे अडकून पडली. अशा वेळी वाहतूक पोलिसांच्या पथकाने जीवाची पर्वा न करता त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले. या वेळी अनेक नागरिक भावूक झाले होते. जणू काही देवमाणसांनी आमचा जीव वाचविल्याची प्रतिक्रिया बाधित नागरिकांनी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89402 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..