
पिवळा बंगला थांबा समस्यांच्या विळख्यात
धारावी, ता. १८ (बातमीदार) : पश्चिम द्रुतगती मार्गावरील धारावीतील राजीव गांधीनगरासमोरील ‘बेस्ट’च्या पिवळा बंगला बसथांब्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना भरपावसात छत्रीचा आसरा घेऊन बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना चुकवत प्रवासी जीव मुठीत धरून बसची वाट बघत असतात.
धारावीतून सायन, चेंबूर, मुलुंड या दिशेला जाणाऱ्या बसच्या थांब्यावर हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे. शालेय विद्यार्थी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी या प्रकारामुळे संताप व्यक्त करत आहेत. रस्त्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशाचा एखादा अपघात झाल्यास याला कोण जबाबदार असेल, असा सवाल प्रवासी करत आहेत. वर्दळीचा रस्ता असल्याने सतत वाहनांची रेलचेल असते. पूर्व उपनगरात व मुंबई शहरात जाणाऱ्या बसचीसुद्धा सतत वर्दळ असते. या वर्दळीच्या बस थांब्यावर झालेला कब्जा दूर करावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89403 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..