
नवी मुंबई बँकेची बिनविरोध निवडणूक
नवी मुंबई, ता. १८ : नवी मुंबई सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सन २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीची निवडणूक बिनविरोध झाली. बँकेचे प्रवर्तक व संचालक सीए बी. आर. सावंत व आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. नवी मुंबईचे माजी नगरसेवक शशिकांत राऊत व प्रभाग समिती सदस्य विठ्ठलशेठ धुमाळ यांच्या योगदानाबाबत नवनिर्वाचित संचालकांनी त्यांचे आभार मानले. निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडल्याबद्दल गणेश नाईक यांनी नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान केला. या वेळी त्यांनी बँक प्रगतिपथावर ठेवण्यासाठी संचालकांनी प्रयत्नशील राहण्याबाबत मार्गदर्शन केले. नागरी सहकारी बँकांसमोर असणारी आव्हाने व रिझर्व्ह बँकेची ध्येयधोरणे यांची सांगड घालून भविष्यात बँकेची भरभराट व्हावी व नवी मुंबईकरांची विश्वासार्हता वृद्धिंगत व्हावी, यासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळ कटिबद्ध राहील, असे सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89413 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..