पावसाळ्यात प्राणिपक्ष्यांचे मदतनीस बनू या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यात प्राणिपक्ष्यांचे मदतनीस बनू या!
पावसाळ्यात प्राणिपक्ष्यांचे मदतनीस बनू या!

पावसाळ्यात प्राणिपक्ष्यांचे मदतनीस बनू या!

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. १८ (बातमीदार) : पावसाळ्यात प्राणिपक्ष्यांचे मदतनीस बनू या, असे आवाहन प्राणी कल्याण संस्था, अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) आणि प्लांट अँड ॲनिमल्स वेल्फेअर सोसायटी यांच्याकडून करण्यात आले आहे.
मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यात वारा आणि सर्वत्र पाणी साचल्याने त्याचा परिणाम केवळ मानवांवरच होत नाही, तर प्राणी आणि पक्ष्यांवरही होतो. जोरदार वाऱ्यामुळे झाडांवरून पडलेले पक्षी, रस्त्यावरील भटके कुत्रे व इतर भटके प्राणी बसण्यासाठी कोरड्या जागेच्या शोधात निवासी भागात येतात, खड्ड्यांत पाणी साचल्याने तेथील साप बाहेर पडतो, बागेत व निवासी परिसरात दिसतो. अशा वेळी नागरिकांनी घाबरून न जाता संयम ठेवावा. त्यांना इजा करू नये, आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही या प्राण्यांची तत्काळ सुटका करून काळजी घेऊ, असे आवाहन अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) आणि प्लांट अँड अनिमल्स वेल्फेअर सोसायटी यांनी नागरिकांना केले आहे.
...
असा करावा बचाव
कोणत्याही प्राण्यास, पक्ष्यास तसेच सरपटणाऱ्या प्राण्यास इजा करू नका किंवा त्यांना मारू नका. त्याच्यावर लक्ष ठेवा. सुरक्षित अंतर ठेवा आणि तत्काळ प्राणी कल्याण संस्थेला कॉल करा किंवा जर ते वन्यजीव असेल, तर तुम्ही मदतीसाठी वनविभागालादेखील कॉल करू शकता, असे निशा कुंजू यांनी सांगितले. सरपटणाऱ्या प्राण्यांचा हा अंडी घालण्याचा, तसेच उबवण्याचा हंगाम असतो. म्हणून सर्प हे कोरड्या आणि तुलनेने उबदार जागा शोधतात. ते घराच्या आत, पुठ्ठ्याच्या खोक्यात, बारीक पिशव्या, माती, दगडाच्या ढिगाऱ्याखाली किंवा अंगणातील ढिगाऱ्यांमध्ये लपणे पसंत करतात.
संकटात असलेल्या प्राण्यांचे संरक्षणासाठी हेल्पलाईन ९८३३४८०३८८ वर कॉल करा, असे आवाहन निशा कुंजू यांनी केले आहे.
...
वन्य प्राण्यांपासून सुरक्षा
सरपटणाऱ्या प्राण्यांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी सुरक्षितपणे लक्षपूर्वक चाला. रात्रीच्या वेळी घराबाहेर असताना नेहमी हातात बॅटरी ठेवा. राहत्या जागेच्या खिडक्या बंद करा. जवळचे खड्डे भरा. अंगण आणि आजूबाजूचा परिसर गवत आणि झुडपांपासून मुक्त आणि स्वच्छ ठेवा. शूज बाहेर ठेवू नका. शूज घालण्यापूर्वी प्रत्येक जोडी काळजीपूर्वक तपासा. सरपटणाऱ्या प्राण्यांना काठीने मारण्याचा प्रयत्न करू नका. कारण ते संतापाने आणि स्वसंरक्षणार्थ दंश करू शकतात.
...
जखमी पक्षाला मदत करावी. पक्षी पकडण्यासाठी त्यावर कापड घाला. पक्षी कार्डबोर्ड बॉक्समध्ये ठेवा आणि हवा, ऑक्सिजन मिळावे म्हणून बॉक्सवर छिद्र करा. पक्ष्याबद्दल कोणतीही माहिती नसताना जबरदस्तीने खायला घालण्याचा प्रयत्न करू नका. वाहन सुरू करण्याआधी चाकाखाली कोणी निवाऱ्यास प्राणी असल्यास त्यांना दूर करा.
- सुनिष सुब्रह्मण्यम, संस्थापक, एसीएफ आणि पीएडब्ल्यूएस, मुंबई
...

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89420 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top