विशेष पथकाची निर्मिती करते खड्डे बुजवू - डॉ भाऊसाहेब दांगडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशेष पथकाची निर्मिती करते खड्डे बुजवू - डॉ भाऊसाहेब दांगडे
विशेष पथकाची निर्मिती करते खड्डे बुजवू - डॉ भाऊसाहेब दांगडे

विशेष पथकाची निर्मिती करते खड्डे बुजवू - डॉ भाऊसाहेब दांगडे

sakal_logo
By

कल्याण, ता. १८ (बातमीदार) : मागील काही दिवस मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यातील खड्डे बुजवण्यास अडचण निर्माण झाली होती; मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्याने प्रभागनिहाय विशेष पथकामार्फत खड्डे बुजवण्यात येतील, अशी माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत सुमारे ४२२ किलोमीटरचे रस्ते असून केडीएमसीसहित एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ आदी शासनाचे विभाग रस्त्यांची देखभाल करतात. मागील आठवडाभर पडलेल्या मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवली शहरातील प्रमुख रस्त्यांसमवेत अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झाली असून अनेक ठिकाणी अपघात झाले आहेत. याची दखल घेत पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिलेल्या आदेशानुसार पालिकेच्या प्रत्येक प्रभागात खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यंदा केडीएमसी हद्दीत रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सुमारे १७ कोटी रुपये अंदाजपत्रकात तरतूद केली असून त्यातील सुमारे १५ कोटी १५ लाख रुपये खर्चाला मान्यता मिळाली असून १३ संस्थांमार्फत खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. कल्याण-डोंबिवली शहरात प्रतिदिन एक ते दीड हजार चौरस मीटर खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89431 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..