
सोनसाखळी, वाहनचोरीचे १२ गंभीर गुन्हे उघड
कळवा : कळवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी व वाहनचोरीच्या अनेक तक्रारी येत होत्या. या अनुषंगाने कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहपोलिस निरीक्षक मंगेश महाजन यांना मिळवलेल्या गुप्त माहितीनुसार पोलिस उपनिरीक्षक किरण बघडाणे यांच्या पथकाने कळवा पूर्व शांती मफतलाल झोपडपट्टीतून कलीम हारुख शेख (१७) याला १६ जुलै रोजी अटक केली. त्याच्या चौकशीत त्याने चोरी केलेल्या तीन गुन्ह्यांतून एक लाख १० हजाराचे २७ ग्रॅम सोन्याचे दागिने त्याच्याकडून हस्तगत केले.
तसेच कळवा रेल्वे पटरीच्या बाजूला असलेल्या भोलानगरमधून आशीष ऊर्फ कामेश्वर यादव (१९) व त्याचा साथीदार कुणाल ऊर्फ अविनाश मोरे (२०, सातपूर नाशिक) या दोघांना १० जुलै रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कळवा, कल्याण बाजारपेठ, कोळशेवाडी आदी ठिकाणच्या वाहन, दागिने, रिक्षा, दुचाकीचोरीचा ६ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अविनाश आंबुरे यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89433 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..