दोन दिवसात ३१ हजार जणांना बूस्टर डोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन दिवसात ३१ हजार जणांना बूस्टर डोस
दोन दिवसात ३१ हजार जणांना बूस्टर डोस

दोन दिवसात ३१ हजार जणांना बूस्टर डोस

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : केंद्र सरकारकडून ‘कोविड लस अमृत महोत्सव’ अंतर्गत पुढील ७५ दिवस बूस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातदेखील याअंतर्गत बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, रविवारपासून त्याचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्यात मागील दोन दिवसांत जिल्ह्यातील विविध शासकीय लसीकरण केंद्रांवर ३१ हजार नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
जानेवारी महिन्यापासून आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली होती. या नागरिकांना शासकीय केंद्रांवर बूस्टर डोस उपलब्ध होता. त्यापाठोपाठ १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रांवर मोफत बूस्टर डोस उपलब्ध करण्यात आला होता. ठाणे जिल्ह्यात ४४ लाख ३९ हजार १६७ इतके नागरिक बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत. रविवारीदेखील काही महापालिकेंचे लसीकरण केंद्र सुरू होते. त्यामुळे मागील दोन ते तीन दिवसांत जिल्ह्यातील ३१ हजार नागरिकांनी विविध शासकीय लसीकरण केंद्रांवर जाऊन बूस्टर डोस घेतला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

मिरा-भाईंदरमध्‍ये साठा संपुष्‍टात
भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महानगरपालिकेने सुरू केलेल्या कोरोना बूस्टर डोस लसीकरणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच महापालिकेकडील कोविशिल्ड लशींचा साठा संपुष्टात आला आहे. परिणामी, बूस्टर डोस लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण झाला आहे.
१८ वर्षांवरील सर्वांना ७५ दिवसांसाठी मोफत बूस्टर डोस देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. दररोज अडीच हजार नागरिकांना बूस्टर डोस देण्याचे लक्ष्य महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून निश्चित करण्यात आले असले, तरी दररोज तीन हजारांच्या आसपास नागरिकांना बूस्टर डोस दिला जात आहे; मात्र महापालिकेकडील कोविशिल्ड लशीचा बूस्टर डोसचा साठा संपुष्टात आला असल्यामुळे या लसीकरणात खंड पडला आहे. येत्या एकदोन दिवसांत लशींचा साठा उपलब्ध होईल, असे उपायुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89444 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..