क्रेडिट कार्ड रिवॉर्डद्वारे फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रेडिट कार्ड रिवॉर्डद्वारे फसवणूक
क्रेडिट कार्ड रिवॉर्डद्वारे फसवणूक

क्रेडिट कार्ड रिवॉर्डद्वारे फसवणूक

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : भारतीय तटरक्षक दलाच्या एका अधिकाऱ्याला क्रेडिट कार्ड रिवॉर्डच्या बहाण्याने भामट्याने १.४५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित अधिकाऱ्याने मलबार हिल पोलिसांकडे तक्रार नोंदवताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्याला अज्ञात अकाऊंटमधून एक संदेश आला. त्यावर रिवॉर्ड आणि एक लिंक होती. अधिकाऱ्याने लिंकवर क्लिक केले असता अवघ्या काही मिनिटांत त्यांच्या बँक खात्यातून सहा व्यवहार झाले. कार्ड ब्लॉक करण्यासाठी त्यांनी तात्काळ बँकेत फोन केला आणि पोलिसांशी संपर्क साधला. या गुन्ह्याशी मिळत्याजुळत्या अशाच एका प्रकरणात अंबोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात एका कार्यरत व्यावसायिकाने ४०,५८० रुपये गमावले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89468 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top