स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाला मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाला मान
स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाला मान

स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाला मान

sakal_logo
By

सकाळ वृतसेवा
मुंबई, ता. १९ : सीएसएमटी स्थानकांत सोमवारी स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या १५ स्वातंत्र्यसैनिकांनी ऐतिहासिक पंजाब मेलला हिरवा झेंडा दाखवण्याचा मान देण्यात आला. ‘आझादी का अमृतमहोत्सव’निमित्त मध्य रेल्वेकडून हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी विभागीय रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्यासह व्यवस्थापक शलभ गोयल आणि मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबई येथे आझादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मध्य रेल्वेने सोमवारी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या फलाट क्रमांक १८ येथून ऐतिहासिक पंजाब मेलला हिरवा झेंडा दाखविण्याचा मान स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना दिला. यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबीयांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी मध्य रेल्वेच्या कलाकारांनी नुक्कड नाटकासोबत आरपीएफच्या वाद्यवृंद कलाकारांनी देशभक्तिपर गाणी सादर केली.

पंजाब मेलला ११० वर्षे पूर्ण
मध्य रेल्वेवरील सर्वात जुन्या ट्रेनपैकी एक पंजाब मेल आहे. १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पिअर मोल स्टेशनवरून पहिल्यांदा धावलेल्या पंजाब मेलने नुकतीच सेवेची ११० वर्षे पूर्ण केली. त्यामुळे उपक्रमासाठी देशभरातून निवडलेल्या २७ ट्रेनपैकी पंजाब मेलची निवड केली आहे.
------------------
स्वातंत्र्य चळवळीत रेल्वेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मध्य रेल्वेचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पुणे, सातारा आणि नाशिक रोड स्थानकांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. भारतीय उपखंडातील पहिली ट्रेन मुंबईतून धावल्याने हे स्थानक स्वातंत्र्य चळवळीचे एक केंद्र असून मध्य रेल्वेसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
- अनिलकुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89479 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..