माहुल परिसरातील रस्त्याला तडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माहुल परिसरातील रस्त्याला तडे
माहुल परिसरातील रस्त्याला तडे

माहुल परिसरातील रस्त्याला तडे

sakal_logo
By

चेंबूर, ता. १८ (बातमीदार) ः चेंबूर येथील माहुल परिसरातील हजरत सय्यद गाजी सालार मलंग शाह कादरी ऊर्फ घासवाले बाबाकडे जाणारा मार्ग खचला आहे. याबाबत तक्रार करूनदेखील पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
माहुल गाव ते आणिक मार्गावर कित्येक वर्षांपासून सय्यद गाजी सालार मलंग शाह कादरी ऊर्फ घास वाले बाबा दर्गा आहे. या दर्ग्याच्या बाजूला मोठा नाला आहे. २००३ मध्ये पालिकेने हा नाला तयार केला. माहुल, आणिक, इस्लामपुरा, सह्याद्री नगर, अशोकनगर, नागा बाबा नगर, शिवाजीनगरमधून जाणारा हा नाला खाडीला जोडलेला आहे. नाल्याची साफसफाई करण्यासाठी पालिकेने नाल्याच्या बाजूने एक मार्ग तयार केला होता. हा मार्ग पीबीटीजवळून दर्ग्याकडे जातो; मात्र हा मार्ग पूर्णपणे खचला असून घासवाला बाबा दर्ग्याकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे.

पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
घासवाला बाबा दर्ग्याकडे १० दिवस उरूस आहे. त्यामुळे या दर्ग्यात मोठ्या प्रमाणात परराज्यांतून भक्त येतात. सध्या आणिक गावाकडून दर्ग्याकडे येणारा मार्गही बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहने जात-येत नाही. हा मार्ग सुरू करण्यात यावा, तसेच खचलेला मार्ग दुरुस्त करावा, यासाठी पालिका अधिकाऱ्यांना अर्ज केले आहेत; मात्र हा खचलेला मार्ग लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89499 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..