
नेरूळमध्ये रिक्षा चोरीला
नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) : डी. वाय. पाटील स्टेडियम परिसरातून एका चालकाची रिक्षा चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याने काही दिवस शोधाशोध केल्यानंतर न सापडल्याने रिक्षा चोरीला गेल्याची नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
नेरूळ सेक्टर-१६ मध्ये कुटुंबासह राहणारा रमेश धोंडू पोसम (वय ५२) यांनी १० जुलै रोजी सकाळी नेहमीप्रमाणे रिक्षा चालविण्यासाठी बाहेर काढली होती. दुपारच्या सुमारास ते डी. वाय. पाटील स्टेडियमलगतच्या सेवा रस्त्यावरील शौचालयात गेले होते. या वेळी त्यांनी रिक्षा त्याच ठिकाणी रस्त्यावर उभी केली होती. याचदरम्यान, चोरट्याने रिक्षा चोरून नेली. पाच मिनिटांनंतर शौचालयातून बाहेर आल्यानंतर त्यांना रिक्षा निदर्शनास आली नाही. त्यांनी एलपी ब्रिज येथील रिक्षा स्टँडजवळ जाऊन ओळखीतील चालकांना रिक्षाचोरीला गेल्याचे सांगितले. कोणीतरी त्यांच्यासोबत मस्करी केली असावी, असे बोलून रिक्षाचालकांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी काही दिवस नवी मुंबईतील विविध ठिकाणी जाऊन रिक्षाचा शोध घेतला. मात्र रिक्षा न सापडल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89513 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..