महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीवर व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीवर व्याख्यान
महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीवर व्याख्यान

महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीवर व्याख्यान

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर शाखेच्या उद्या (ता. २०) संध्याकाळी सात वाजता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीशी निगडित सत्यशोधक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याखनमालेचे हे दुसरे पर्व असून ही व्याख्यानमाला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. गेल्या ७५ वर्षांत महिला, युवक, शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी यांच्या अनेक चळवळी झाल्या. त्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या व्याख्यानमालेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीने भारतीय समाजमनावर एक नवीन ठसा उमटवला आहे, त्या चळवळीचा मागोवा व्याख्यानातून घेण्यात येणार आहे. या व्याख्यानमालेत मुक्ता दाभोलकर या महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी रेखा देशपांडे (९१६७०२९८४४), विजय खरात (९७५७२४९४८६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89562 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..