बुस्टर डोससाठी कॉल सेंटरच्या माध्यमातून साद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुस्टर डोससाठी कॉल सेंटरच्या माध्यमातून साद
बुस्टर डोससाठी कॉल सेंटरच्या माध्यमातून साद

बुस्टर डोससाठी कॉल सेंटरच्या माध्यमातून साद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ ः कोविड लस अमृतमहोत्सावांतर्गत मोफत बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा आरोग्य विभाग यांनीदेखील हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार महापालिकेने ३२ आरोग्य केंद्रामार्फत मोफत बूस्टर डोस देण्यात सुरुवात केली आहे. तसेच बूस्टर डोस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेच्या कॉल सेंटरमधून ठाणेकरांना मोबाईलवर संदेश पाठवून व फोन करून साद घालण्यात येत आहे; तर सोमवारी एका दिवसात तीन हजार ९०८ जणांना बूस्टर डोस देण्यात आले असल्याचेदेखील पालिकेने स्पष्ट केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील शासकीय लसीकरण केंद्रांवर १५ जुलैपासून १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यात महापालिकेकडूनदेखील ३२ आरोग्य केंद्रांतून कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार सोमवारी (ता. १८) तब्बल तीन हजार ९०८ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आले आहेत; तर आतापर्यंत एकूण ९७ हजार ५३६ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. तसेच ज्या नागरिकांनी बूस्टर डोस घेतला नाही अशा नागरिकांना महापालिकेच्या कॉल सेंटरच्या माध्यमातून बूस्टर डोस घेतला की नाही, याची विचारणा करण्यात येत आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून महिन्याला सुमारे एक लाख नागरिकांना कॉल केले जात असल्याचा दावा पालिकेने केला आहे. महापालिका हद्दीत १७ लाख नऊ हजारांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत १६ लाख ७० हजार नागरिकांनी ठाण्यात लसीकरण केले आहे; तर ३९ हजार नागरिकांनी ठाण्याबाहेर लसीकरण केले असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १०० टक्के झाली आहे; तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १४ लाख २६ हजार ३०२ एवढी असून हे प्रमाण ८७ टक्के असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
...
हर घर दस्तक मोहीम
लसीकरण मोहीम वाढवण्यासाठी महापालिकेने हर घर दस्तक ही मोहीम सुरू केली आहे. त्याच्या दुसऱ्या टप्प्यात घरोघरी जाऊन लसीकरण केले जात आहे. त्यानुसार आतापर्यंत या मोहिमेंतर्गत ४८ हजार ५५६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
---
ठाणे शहरातील नागरिकांना दुसऱ्या डोससह बूस्टर डोसदेखील मिळावा यासाठी पुढील आठवड्यापासून वागळे औद्योगिक केंद्र, टीसीएस या औद्योगिक ठिकाणांवर बूस्टर डोसची मोहीम राबवली जाणार आहे.
- मनीष जोशी, उपायुक्त, ठामपा.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89575 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top