नदीत बुडून मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नदीत बुडून मृत्यू  झालेल्यांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत
नदीत बुडून मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत

नदीत बुडून मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत

sakal_logo
By

भिवंडी, ता. १९ (बातमीदार) ः भिवंडी शहरातील नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांसह ग्रामीण भागात बंधाऱ्याच्या पाण्यात मासेमारी करण्यास गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या कुटुंबियांना भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी चार लाखांचा धनादेश देण्यात आला.

महाप गावातील पिंट्या पुंडलिक जाधव(वय ४७), अवचितपाडा येथील आशिफ आलम अन्सारी (वय १९), विठ्ठल नगर येथील इम्रान रईस मन्सुरी (वय २०), सुफियान रईस मन्सुरी (वय १६) अशी मृतांची नावे आहेत. पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना तात्काळ शासन मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत तहसीलदार अधिक पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर व शासनाला अहवाल पाठवला. त्यानंतर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज तहसीलदार पाटील व मंडळ अधिकारी यांनी प्रत्यक्ष मृत कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना या मदतीचा धनादेश सुपूर्द करीत कुटुंबियांचे सांत्वन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89577 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top