अग्निशमन विभागात प्रतमच महिला कर्मचारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अग्निशमन विभागात प्रतमच महिला कर्मचारी
अग्निशमन विभागात प्रतमच महिला कर्मचारी

अग्निशमन विभागात प्रतमच महिला कर्मचारी

sakal_logo
By

कल्याण, ता. १९ (बातमीदार) ः मुंबई महापालिकेनंतर आता कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलातही प्रथमच बाह्य यंत्रणेद्वारे १५ महिला अग्निशामक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महिला कर्मचारी आता आपत्ती काळात नागरिकांच्या मदतीसाठी इतर अग्निशमन अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत सज्ज राहणार आहेत.

अग्निशामक महिला कर्मचारी सध्या टिटवाळा, आधारवाडी, कल्याण (प), डोंबिवली (प) येथील अग्निशमन केंद्रांत कार्यरत आहेत. महिलांनादेखील अग्निशमन दलात समाविष्ट करून महापालिकेने महिलांना प्रगतीचे नवे दालन खुले केले असल्याचे बोलले जात आहे. सध्या महापालिकेचे आधारवाडी कल्याण पश्चिम, टिटवाळा पूर्व, कल्याण पूर्व, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम या पाच ठिकाणी अग्निशमन केंद्रे आहेत. आता डोंबिवलीतील पलावा परिसरातही अग्निशमन विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन केंद्र पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89578 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top