सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा
सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा

सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा

sakal_logo
By

नवीन पनवेल (वार्ताहर) : करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी कोकण शिक्षक मतदारसंघ आमदार बाळाराम पाटील, काशिनाथ पाटील, राजेश केणी, प्रल्हाद केणी, अनिल केणी, राम पाटील, उपसरपंच योगेंद्र कैकाडी उपस्थित होते. करंजाडे येथे जलकुंभाचे उद्‍घाटन बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महिला बालकल्याण विभागाकडून सुमारे ७० महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी बांधवांना वनशेतीसाठी फळ रोपे वाटप करण्यात आली. करंजाडे येथील रायगड जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये महिलांना कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89600 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top