पांगलोळी गावात प्रशासकीय पथक दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पांगलोळी गावात प्रशासकीय पथक दाखल
पांगलोळी गावात प्रशासकीय पथक दाखल

पांगलोळी गावात प्रशासकीय पथक दाखल

sakal_logo
By

रोहा, ता. २० (बातमीदार) ः तालुक्यातील पांगलोळी गावातील ११ गुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळच्या दरम्यान घडली. गुरांच्या मृत्‍यूचे कारण अद्याप स्‍पष्‍ट न झाल्‍याने परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार, प्रांत अधिकारी, उपआयुक्त जिल्हा पशुसंवर्धन, पशुसंवर्धन अधिकारी, तहसीलदार आदींच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी गावात भेट देत परिस्थिती माहिती घेतली आणि ग्रामस्‍थांना धीर दिला. व ग्रामस्थांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले.
प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार, उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन डॉ. रत्नाकर काळे, जि. प. पशुसंवर्धन अधिकारी डॉ.श्याम कदम, रोहा तहसिलदार कविता जाधव आदींनी मौजे पांगळोली येथे प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्‍थांशी संवाद साधला. यावेळी पशूंच्या आरोग्याबाबत विशेषतः पावसाळ्‌यात गुरांची कशा प्रकारे घ्‍यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गावात दोन दिवसांत एकही पशू दगावला नसून काहींवर उपचार सुरू आहेत. त्‍यांच्या प्रकृतीत सुधारण होत आहे. त्‍यामुळे नागरिकांनी घाबरून जाउ नये, तसेच अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
--------------------


विद्युत वाहिनीचा शाॅक लागून ३ म्हशींसह १ पारडू जागीच ठार

पेण, ता. २० (वार्ताहर) : विद्युत वाहिनीच्या तारेचा शॉक लागून तीन म्हशींसह एक पारडू जागीच ठार झाल्याची घटना पेण तालुक्यातील आराव येथे दि.१९ रोजी घडली आहे.या बाबत सविस्तर वृत्त असे की पावसाचा जोर कमी असल्याने तालुक्यातील आराव येथील दुध व्यवसायीक श्रीपाद वसंत भोसले यांनी आपल्या मालकीच्या ३ म्हशी व १ पारडू पेण खोपोली हमरस्त्यालगत असणाऱ्या रणजीत फार्म हाऊसच्या मोकळ्या जागेत चरण्यासाठी आणल्या असता त्याठिकाणी सुरु असणा-या डीपीवरील विद्युत प्रवाहातील तार तुटून त्याचा स्पर्श तेथील घरत असणा-या म्हशींसह पारडूला झाल्याने त्यांचे जागीच मृत्यू झाला याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहायक फौजदार के.ई.तडवी करीत आहेत.
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89607 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..