वस‌ईतील तीन युवक लडाख सायकल मोहिमेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वस‌ईतील तीन युवक लडाख सायकल मोहिमेवर
वस‌ईतील तीन युवक लडाख सायकल मोहिमेवर

वस‌ईतील तीन युवक लडाख सायकल मोहिमेवर

sakal_logo
By

विरार, ता. २० (बातमीदार) ः वसईतील तीन युवक सायकलवरून वसई ते लडाख प्रवासाला निघाले आहेत. या प्रवासात ते पाण्याविषयी जनजागृती करणार आहेत. तब्बल २५५० किलोमीटरचा हा प्रवास हे तिघे २८ दिवसांत पूर्ण करणार आहेत.
ज्युड डिसोझा, सचिन कवळी व प्रणव राऊत अशी या तीन तरुणांची नावे असून ते वसई ॲडव्‍हेंचर फाऊंडेशनच्या माध्यमातून या मोहिमेसाठी निघाले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरयाना, अमृतसर, जम्मू-काश्मीर व लडाख असा त्यांचा प्रवास असणार आहे. २० ते २२ किलो वजनी सामान प्रत्येकाकडे असून त्यात अत्यावश्यक कपडे, सायकलचे स्पेअर पार्ट, ऑर्इल, ट्यूब यांचा समावेश आहे. या मोहिमेसाठी त्यांना वसई-विरार शहर महापालिका, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडून प्रवासासाठी अत्यावश्यक कागदपत्रे तसेच स्थानिक पोलिस ठाण्यातून ओळखपत्र देण्यात आली आहेत.
नुकतेच वसईतील हुतात्मा बाळा सावंत स्मारक येथून वस‌ई-विरार महापालिकेचे माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. या वेळी शुभेच्छा देण्यासाठी फाऊंडेशनचे सदस्य, नातेवाईक व स्थानिक वसईकर नागरिक उपस्थित होते.

अनेक मोहिमा
वसई ॲडव्‍हेंचर क्लब हा २००३ पासून सुरू असून २०२१ मध्‍ये वसई ॲडव्‍हेंचर फाऊंडेशन म्हणून नोंदणी झाली आहे. याच्या माध्यमातून वसई-विरारमधील शेकडो तरुण-तरुणींनी देश-विदेशातील अनेक ट्रेक मोहिमा, हिमालयीन मोहिमा यशस्वीपणे पार केलेल्या आहेत. या संघटनेच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम स्थानिक पातळीवर राबवले जात आहेत. लांब पल्ल्याच्या सायकल मोहिमांमध्ये वसई ते काठमांडू, वसई ते लेह-लडाख, वस‌ई ते रामेश्वरम, वसई ते स्टॅच्यू ऑफ युनिटी अशा मोहिमा आखल्या गेल्या असून वसई ते लडाख ही आजची तिसरी लांब पल्ल्याची सायकल मोहीम आहे.

आजच्या काळात पाणी वाचवणे गरजेचे आहे. अनेक देशांत पाण्याची मोठी टंचाई होऊ लागली आहे. पाणी वाचले तर जीवन वाचेल, हाच संदेश आम्ही या मोहिमेतून देत जाणार आहोत. यातून जनजागृती झाली तरी आमची मोहीम यशस्वी झाल्याचे समाधान मिळेल.
- ज्यूड डिसोझा, सायकलस्‍वार

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89609 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..