...अन्‍यथा पीओपी मुर्तींना वेशीवरच बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...अन्‍यथा पीओपी मुर्तींना वेशीवरच बंदी
...अन्‍यथा पीओपी मुर्तींना वेशीवरच बंदी

...अन्‍यथा पीओपी मुर्तींना वेशीवरच बंदी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव काळात श्रींच्या पीओपी मूर्तीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच विनापरवाना गणेशमूर्ती निर्मिती व विक्री केल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी तंबी पालिका प्रशासनाने दिली आहे. या निर्णयाचे कल्याण शहर गणेशोत्सव समन्वय समितीने स्वागत केले आहे. कल्याण-डोंबिवलीतील मूर्तिकार, मंडळे मातीच्या मूर्तींना प्राधान्य देतील; मात्र विसर्जनासाठी गणेश घाटावर मूर्ती ही हातात उचलून न्यावी लागते, मातीची मूर्ती जड असल्याने मंडळांना ती हातावर नेणे शक्य नाही. शहराबाहेरून अनेक पीओपीच्या मूर्ती विसर्जनासाठी गणेश घाटावर येत असतात, त्यांना कोणते नियम पालिकेने लागू केले आहेत, असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे. शहराबाहेरून येणाऱ्या पीओपीच्या मूर्तींवरदेखील बंदी घालावी; अन्यथा समितीच्या वतीने बाहेरून येणाऱ्या पीओपीच्या मूर्ती या वेशीवरच अडवल्या जातील, असा इशारा समितीने पालिका प्रशासनाला दिला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. शहरातील मूर्तिकारांकडे पीओपीच्या मूर्ती बनवून तयार आहेत. सार्वजनिक मंडळांना मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व विसर्जन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहर गणेशोत्सव समन्वय समितीची सर्वसाधारण बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीत कल्याण शहरातील गणेश मूर्तिकार संघटना, गणेश मंडळे, संबंधित संस्था तथा समन्वय समितीचे सल्लागार उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89619 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..