डिव्हायडर आणि रस्त्यामध्‍ये ‘गॅप’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिव्हायडर आणि रस्त्यामध्‍ये ‘गॅप’
डिव्हायडर आणि रस्त्यामध्‍ये ‘गॅप’

डिव्हायडर आणि रस्त्यामध्‍ये ‘गॅप’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० ः कल्याण-शीळ रोडचे सिमेंट काँक्रीटीकरणचे काम एमएसआरडीसीअंतर्गत सुरू आहे. हे काम अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत असल्याने वाहनकोंडीचा सामना चालक करत आहेत. त्यात डिव्हायडर आणि रस्ता यांच्यामध्ये गॅप असून वाहन चालवताना त्याचा अंदाज न आल्याने या गॅपमध्ये चारचाकी वाहने फसत आहेत. मंगळवारी सायंकाळी अशीच एक चारचाकी या गॅपमध्ये फसल्याने वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावरील वाहनचालक आणि नागरिकांच्या मदतीने हे वाहन अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आले.
कल्याण-शीळ रोडचे रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. एमएसआरडीसीअंतर्गत सुरू असलेल्या या संथगती कामाचा फटका वाहनचालकांना दररोज सहन करावा लागत असून तासन् तास वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडलेली असतात.
काही ठिकाणी रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम झाले असून डिव्हायडरचे काम सुरू आहे. कल्याण दिशेला चार ते पाचपदरी रस्त्याचे काम झाले असून डिव्हायडरचे काम येथे शिल्लक आहे. कल्याण-शीळ रोडचे काम अर्धवट अवस्थेत असून अनेक ठिकाणी असलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना चालकांना करावा लागतो. त्यात भर म्हणून डिव्हायडर आणि रस्ता यात राहिलेल्या गॅपची भर पडत आहे. या अंतराचा वाहनचालकांना अंदाज न आल्यास त्यात वाहने फसत आहेत. यामुळेदेखील वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
मंगळवारी सायंकाळी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील रस्त्यावर मुंबई दिशेला जाणाऱ्या मार्गावर चारचाकी वाहन डिव्हायडर आणि रस्त्याच्या गॅपमध्ये फसले. यामुळे काही काळासाठी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. नागरिक चारचाकी बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र चारचाकी बाहेर निघत नव्हती. अखेर रस्त्यावरील वाहनचालकांनी व नागरिकांनी हातभार लावत गाडी बाहेर काढली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89629 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..