श्वसनाशी संबंधित आजारावर ‘वायरालेक्स’ औषध प्रभावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्वसनाशी संबंधित आजारावर 
‘वायरालेक्स’ औषध प्रभावी
श्वसनाशी संबंधित आजारावर ‘वायरालेक्स’ औषध प्रभावी

श्वसनाशी संबंधित आजारावर ‘वायरालेक्स’ औषध प्रभावी

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोविडवरील तसेच श्वसनमार्गाला होणाऱ्या गंभीर विषाणू संसर्गावरील उपचारांसाठी ‘वायरालेक्स’ हे प्रभावी आणि सुरक्षित औषध आहे. या औषधाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची (डीजीसीआय) मान्यता मिळाली आहे. कोरोनाचे नवे व्हेरिएंट्स आले असले तरी हे औषध प्रभावी ठरेल, असा दावा करण्यात आला आहे.
भारतात करण्यात आलेल्या डबल-ब्लाइंड, रँडमाइज्ड प्लेसिबो कंट्रोल चाचणीनंतर हे औषध सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आले आहे. या औषधाच्या क्लिनिकल प्रतिक्रियेचा व रोगमुक्त करण्याचा वेग जास्त असल्याचे यामध्ये दिसून आले. कोविडच्या दुसऱ्या लाटेवेळी चाचणी स्वरूपात ज्या रुग्णांना हे औषध देण्यात आले, त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्यानेच निष्पन्न झाले.
‘वायरालेक्स’चा फायदा असा, की हे औषध फक्त कोविड १९ वर नाही, तर श्वसनमार्गाच्या इतर विषाणू संसर्गांवरदेखील प्रभावी आहे. १८ ते ७५ वयोगटातील भारतीय रुग्णांवर या क्लिनिकल चाचण्या करण्यात आल्या असून भारतातील ११ केंद्रांवर याचा अभ्यास करण्यात आला आहे. ‘वायरालेक्स’ हे तोंडावाटे घेण्याचे औषध असून नोंदणीकृत वैद्यकीय प्रॅक्टिशनरचे रीतसर प्रीस्क्रिप्शन असेल तरच हे औषध मिळते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89644 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..