शिवसेनेचे हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचे हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला
शिवसेनेचे हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला

शिवसेनेचे हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० ः शिवसेनेचे कल्याण उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर तलवार, रॉड यांसरख्या हत्यारांनी हल्ला झाल्याची घटना बुधवारी (ता.२०) सकाळी घडली. या हल्ल्यात पालांडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालांडे हे उद्धव ठाकरे समर्थक आहेत. हा हल्ला एकनाथ शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्या साथीदारांनी केल्याचा आरोप पालांडे यांनी केला आहे. तर गायकवाड यांनी हे आरोप फेटाळले आहेत. कोळसेवाडी पोलिस याचा तपास करत आहेत. या घटनेमुळे कल्याण डोंबिवली परिसरात राजकीय वातावारणात तणाव निर्माण झाला आहे.
हर्षवर्धन पलांडे हे बुधवारी (ता.२०) सकाळी नेहमी प्रमाणे कामाला जाण्यासाठी निघाले होते. कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवर ते थांबले होते. तेव्हा त्यांच्यासमोर एक वाहन येऊन उभे राहिले. पालांडे यांनी काही कळण्याच्या आत चार ते पाच जणांनी पलांडे यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. काहींनी पालांडे यांच्यावर तलवार, चॉपरने वार केले. मारहाण केल्यानंतर मारेकरी पळून गेले. पालांडे यांना मारहाण झाल्याचे समजताच कल्याणमधील ठाकरे समर्थकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना त्वरित खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

आपण उद्धव ठाकरे समर्थक आहोत. त्यामुळेच शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचे हर्षवर्धन पालांडे यांनी सांगितले. शिवसेनेत खूप पुढे पुढे होऊन काम करत आहेस असे मारेकरी म्हणत असल्याचे पलांडे यांनी सांगितले. माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी पालांडे यांचा आरोप फेटाळला आहे. हल्ला झाला हे दुर्दैवी, मात्र माझा याच्याशी काडीमात्र संबंध नाही. पोलिसांनी तपास करत कारवाई करावी. माझ्यावर खोटे आरोप करत बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. ही मारहाण म्हणजे दबाव तंत्राचा भाग असण्याची शक्यता ठाकरे समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89659 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..