शिवाजी पार्कचे सुशोभीकरण लांबणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी पार्कचे सुशोभीकरण लांबणीवर
शिवाजी पार्कचे सुशोभीकरण लांबणीवर

शिवाजी पार्कचे सुशोभीकरण लांबणीवर

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील सुशोभीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे. शिवाजी पार्क येथील स्थानिक रहिवाशी आणि जी/उत्तर विभागाच्या अधिकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत या प्रकल्पाची तांत्रिक पडताळणी करण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे ठाकरे यांचा हा प्रकल्प लांबणीवर पडला आहे.
मुंबई महापालिकेने शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाची ४.७ कोटी रुपयांची निविदा काढली होती. त्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेणखतयुक्त लाल माती, गवत लावणे, ऐतिहासिक पाणपोईचे सुशोभीकरण करण्यात येणार होते. मैदानात ४५० ट्रक लाल माती टाकल्यामुळे स्थानिकांची गैरसोय झाली होती. तसेच आगामी तीन वर्षांसाठी २.९९ कोटी रुपयांचा खर्च हा मैदानावर पाणी मारणे, गवत लावणे, सुरक्षा आदी कारणांसाठी देण्यात येणार होता. त्यामध्ये ३६५ दिवसांपैकी १९८ दिवस काम हे कंत्राटदाराला मिळणार होते. त्यामुळे दिवसाला ५० हजार रुपये फक्त पाणी मारण्यापोटी खर्च होणार होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पार्क कृती समितीने ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती. अखेर ही निविदा रद्द करण्यात आली.
----
समिती स्थापन करणार!
शिवाजी पार्कचे स्थानिक रहिवासी, सदर प्रकल्पाचे तज्ज्ञ सल्लागार, रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेशी संबंधित सल्लागार तसेच महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांची कोअर कमिटी स्थापन करून या विषयावर उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामुळेच समितीच्या सल्ल्याच्या उपाययोजना जोवर स्पष्ट होत नाहीत, तोवर या प्रकल्पाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89680 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..