माजी मंत्र्यांच्या नावे फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी मंत्र्यांच्या नावे फसवणूक
माजी मंत्र्यांच्या नावे फसवणूक

माजी मंत्र्यांच्या नावे फसवणूक

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा नातेवाईक असल्याची बतावणी करत ऊर्जा विभागात सरकारी नोकरी देण्याची हमी देऊन तरुणांची फसवणूक करणाऱ्याला मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या युनिट- १२ च्या पथकाने अटक केली आहे. संदीप राऊत (रा. सातारा) असे आरोपीचे नाव आहे. राऊत हा मुंबईतील एका गेस्ट हाऊसमध्ये तळ ठोकून कारवाया करत होता. त्याच्याविरोधात फसवणुकीचे दोन डझनहून अधिक गुन्हे राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत दाखल आहेत. या आरोपीचा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी काहीही संबंध नाही. त्याच्याकडून बनावट नियुक्तीपत्र, ओळखपत्र, रबर स्टॅम्प, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, दोन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता, २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89682 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..