साईडपट्ट्यांविना रस्त्याशेजारी डबके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साईडपट्ट्यांविना रस्त्याशेजारी डबके
साईडपट्ट्यांविना रस्त्याशेजारी डबके

साईडपट्ट्यांविना रस्त्याशेजारी डबके

sakal_logo
By

उरण, ता. २० (वार्ताहर) : खोपटा - कोप्रोली रस्त्यावर सध्या पावसाळ्यात जीवघेणे खड्डे असून साईटपट्ट्याही उखडल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण यांनी सदर रस्त्यावरील खड्ड्यांकडे लक्ष केंद्रित न केल्यास वाहनांना अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती वाहनचालक व्यक्त करत आहेत.

उरण पूर्व विभागातील बांधपाडा (खोपटा), कोप्रोली, पिरकोण, आवरे, गोवठणे, वशेणी, पाले, मोठी जुई, कळंबुसरे, चिरनेर आदि ग्रामपंचायत हद्दीतील गावांना जोडणारा; तसेच पनवेल, पेण, अलिबाग तालुक्यातील गावांना जोडणारा खोपटा - कोप्रोली हा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याची दुरवस्था होत असल्याने आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून खोपटा- कोप्रोली - चिरनेर रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी एनएचएआयकडून २०२१-२२ साली सुमारे तीन कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर करून घेतला होता. सदर मंजूर करण्यात आलेला निधी एनएचएआयने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्गही करून घेतला.

खोपटा - कोप्रोली - चिरनेर या सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमच निधी उपलब्ध झाला होता. त्यामुळे पूर्व विभागातील नागरिकांनी आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त करत बॅनर लावले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळेझाक कारभारामुळे सध्या पावसाळ्यात रस्त्यावर मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिक व्यक्त करत आहेत.

रस्त्यावर पुन्हा खड्डे
तीन कोटी ७५ लाखांच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियुक्ती केलेल्या ठेकेदारांनी उत्तम दर्जाचे डांबरीकरण व साईटपट्ट्यांचे काम न करता सदर रस्त्यावर निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाचे काम केले. त्यामुळे काही दिवसांतच सदर रस्त्याची दुरवस्था झाली. यानंतर प्रवाशांनी या रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने मे २०२२ मध्ये पुन्हा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89685 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..