महामंडळाच्या निर्णयामुळे एसटी बँकेवर गंडांतर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामंडळाच्या निर्णयामुळे 
एसटी बँकेवर गंडांतर?
महामंडळाच्या निर्णयामुळे एसटी बँकेवर गंडांतर?

महामंडळाच्या निर्णयामुळे एसटी बँकेवर गंडांतर?

sakal_logo
By

नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : एसटी कर्मचाऱ्यांची पगारदार असलेल्या स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप बँकेला गेल्या काही वर्षांपासून उतरती कळा लागली आहे. आता तर चक्क एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना फेडरल बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीसारख्या खासगी बँकांमध्ये वेतन खाते उघडण्यासंदर्भात सूचना देण्यात आले आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे एसटी बँकेवर गंडांतर येणार नाही ना, अशी चर्चा महामंडळात सुरू आहे.
राज्यभरात स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकच्या ५० शाखा, तर ११ विस्तार केंद्रे कार्यरत आहे. सुमारे ८१ हजार ३०२ कर्मचारी या बँकेचे सभासद आहे. त्यांचे बहुतांश व्यवहार याच बँकेतून चालतात. एसटी बँकेत दोन हजार २०० कोटींच्या ठेवी, तर १६०० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. एकूण सभासदांपैकी ७५ टक्के सदस्यांनी एसटी बँकेचे कर्ज घेतले आहे. पूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया आणि स्टेट ट्रन्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकमध्ये वेतन खाते उघडणे बंधनकारक होते; मात्र आता एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट ट्रन्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेव्यतिरिक्त फेडरल बँक, एचडीएफसी बँक तसेच आयसीआयसीआय बँकेत खाते उघडण्याचा सूचना एसटी महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी यांनी दिल्या आहे. याबाबत महामंडळाकडून एक परिपत्रक काढण्यात आले आहे.
---
‘ना हरकत’ प्रमाणपत्र गरजेचे!
शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी मान्यता दिलेली आहे. त्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना खासगी बँकेत खाते उघडण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. तसेच नव्या कार्यपद्धतीनुसार, एसटी कर्मचाऱ्याने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून वैयक्तिक कर्ज घेतले असल्यास त्यांनी इतर बँकेत खाती उघडण्यापूर्वी स्टेट बँकेचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
............
एसटी बँकेचा विस्तार
- एकूण एसटी कर्मचारी - ९२ हजार
- एसटी बँकेचे सभासद - ८१ हजार
- एसटी बँकेतील खाते - ३५ हजार
- स्टेट बँक ऑफ इंडियातील खाते - ५७ हजार
- एसटी बँकेतील ठेवी - २२०० कोटी
- एसटी बँकेकडून कर्जविस्तार - १६०० कोटी
...............
कोट-
स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप बँकेने कर्जावरील व्याजदर कमी केले असते, तर ही परिस्थिती आली नसती. सध्या बँकिंग क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचा फायदा म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना पगार खात्यासाठी दुसरे पर्याय मिळाले आहेत. एसटी बँकेला याचा मोठा फटका बसणार आहे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस
..........
एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांचे वेतन खाते अन्य बँकेत उघडण्यासंदर्भात पत्रक काढले आहे. त्यावर मी काही प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाहीत.
- दिलीप कान्हेरे, व्यस्थापकीय संचालक, स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँक
...........
एसटी कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कर्मचारी स्वेच्छेने दिलेल्या बँकेत वेतन खाते उघडू शकतात. त्यांच्या फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
................
कर्मचाऱ्यांना फायदा होईल!
एसटी बँकेतील सभासदांकडून कर्जावर ११.४० टक्के व्याज आकारले जाते. तसेच ओव्हर ड्रॉफही बँकेतून मिळत नाही. त्यामुळे स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकेविरोधात अनेक सभासदांनी महामंडळाकडे तक्रारी केल्या होत्या. याशिवाय स्टेट बँकेनेही तीनवेळा व्यवहार केल्यानंतर सेवाशुल्क आकारले जात होते. आता महामंडळाने कर्मचाऱ्यांना अन्य बँकांचा पर्याय दिल्याने त्यांना त्याचा फायदाच होणार असल्याचे सांगितले जात आहे.
.....................................
एसटी बँकेला फटका
स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकेने सभासदांसाठी रुपी फंड योजना आणली होती. दर महिन्याला किमान २५० रुपये या फंडात जमा केला जात होता. यावर वार्षिक व्याज कर्मचाऱ्यांना मिळत होते. या फंडातून एसटी बँक कर्मचाऱ्यांना कर्ज वाटप करत होती; मात्र आता खासगी बँकेत खाते सुरू करण्याची अनुमती दिल्यामुळे बँकेचे सभासदत्व कमी होईल. पर्यायाने त्याचा फटका एसटी महामंडळाला बसणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89686 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..