पालघरमध्ये शिवसैनिकांचे शक्तीप्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमध्ये शिवसैनिकांचे शक्तीप्रदर्शन
पालघरमध्ये शिवसैनिकांचे शक्तीप्रदर्शन

पालघरमध्ये शिवसैनिकांचे शक्तीप्रदर्शन

sakal_logo
By

पालघर, ता. २० (बातमीदार) ः शिवसेनेतून काही आमदार, खासदारांनी स्वतःच्या स्वार्थाकरता बंडखोरी केली असली तरी निष्ठावंत शिवसैनिक पक्षासोबतच ठाम उभे आहेत. संकटाच्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ आम्ही कदापी सोडणार नाहीत. गद्दारांनी कितीही आदळापट केली तरीही शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला पालघर हा अभेद्य राहील असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संखे यांनी आज शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात व्यक्त केला. मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवणार असून त्यांना सूर्य नदीचे पाणी पाजल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे या वेळ संखे म्हणाले. पालघरमध्ये मच्छीमार समुहाच्या सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला. यात संखे बोलत होते.

मेळाव्याच्या सुरुवातीला संपर्कप्रमुख केतन पाटील, सहसंपर्कप्रमुख निलेश गंधे, वैभव संखे, बोईसर विधानसभा जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, वसई विरार विधानसभा जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढान, पंचायत समिती सभापती रंजना म्हसकर, जिल्हा परिषद गटनेता जयेंद्र दुबळा, पालघर जिल्हा महिला संपर्कप्रमुख ममता चेंबूरकर, उपजिल्हाप्रमुख जगदीश धोडी, राजेश कुठे, किरण चंदवणकर, तालुकाप्रमुख विकास मोरे, पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष सचिन पाटील, पालघर नगरपरिषद गटनेता कैलास म्हात्रे, जव्हार तालुकाप्रमुख श्रावण खरपडे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89689 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top