
गणेशोत्सव मंडळाच्या अर्जांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबई महापालिकेला गणेशोत्सव मंडळांकडून मंडपाच्या परवानग्यांसाठी अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पालिकेकडे आतापर्यंत ३७३ अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी ११२ म्हणजेच ३३ टक्के अर्जांना पालिकेने परवानगी दिली आहे. तर जवळपास ६० टक्के अर्ज परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.
पालिकेकडे संपूर्ण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांकडून एकूण ३७३ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये ३५ अर्ज हे दुबार आहेत. तर ३३८ अर्ज हे सध्या तपासणी प्रक्रियेत आहेत. पालिकेकडून आतापर्यंत ११२ अर्जांना परवानगी देण्यात आल्याची माहिती पालिका गणेशोत्सव समन्वयाचे उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली. तर २०० अर्ज हे विविध पातळीवर तपासणीसाठी आहेत. तर पालिकेकडून २६ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. जवळपास ८ टक्के परवानग्या पालिकेने नाकारल्या आहेत. पालिकेला सर्वाधिक अर्ज हे मुंबई उपनगरातून दाखल झाले आहेत. मुंबई पालिकेकडून देण्यात येणाऱ्या अर्जांच्या परवानग्यांमध्ये वाहतूक, स्थानिक पोलिस ठाणे तसेच पालिकेच्या कार्यालयीन परवानगीचा समावेश असतो. आतापर्यंत कुर्ला, दादर, प्रभादेवी, वरळी, गिरगाव या भागातून गणेशोत्सव मंडळांनी अर्ज केले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89699 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..