नवी मुंबई, पनवेलमधील महिला कोरोनायोद्ध्यांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबई, पनवेलमधील महिला कोरोनायोद्ध्यांचा सन्मान
नवी मुंबई, पनवेलमधील महिला कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

नवी मुंबई, पनवेलमधील महिला कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

sakal_logo
By

वाशी (बातमीदार) : कोरोना काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या साठहून अधिक होमिओपॅथिक महिला डॉक्टरांना होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन महाराष्ट्र अर्थात हिंमापच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. वाशीत या सोहळ्याला नवी मुंबई, पनवेलमधील होमिओपॅथिक महिला डॉक्टरांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमासाठी उज्ज्वला हावरे आणि माजी नगरसेविका माधवी शिंदे प्रमुख अतिथी; तर अध्यक्ष म्हणून डॉ. एस. पी. गोसावी उपस्थित होते. आयोजक हिंमापच्या महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. रूपाली कलुसे, नवी मुंबई अध्यक्ष डॉ. प्रतीक तांबे व्यासपीठावर होते. कोरोना काळात महिला डॉक्टरांना घर, घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना सांभाळून स्वत:चे कामही सांभाळावे लागत होते. त्यांनी हे काम अत्यंत शिताफीने सांभाळले आहे. त्यामुळे या महिला डॉक्टरांचा सन्मान करणे यथोचित होते, असे उज्ज्वला हावरे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89729 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..