५ हजार ग्राहकांच्या गोपनीय माहितीची विक्री; तिघांविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news mumbai selling confidential information
पाच हजार ग्राहकांच्या गोपनीय माहितीची विक्री

५ हजार ग्राहकांच्या गोपनीय माहितीची विक्री; तिघांविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई : नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पाच हजार ग्राहकांची गोपनीय माहिती चोरी करून त्याची खुल्या बाजारात विक्री केली. याप्रकरणी कंपनीच्या तक्रारीनुसार एपीएमसी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाशीतील सत्रा प्लाझा इमारतीत पॅराडाईज ग्रुपचे मुख्य कार्यालय आहे. या समूहाच्या पनवेल, तळोजा, डोंबिवली, खारघर या ठिकाणांव्यतिरिक्त अन्य प्रकल्पांची माहिती तसेच बांधकाम साईटला भेट देणारे, घरांची बुकिंग करणाऱ्या ग्राहकांच्या व्यवहारांची माहिती संगणकामध्ये संकलित केली जाते.

१ मे ते ३१ जूनदरम्यान समूहाच्या विविध साईटवर भेट दिलेले ग्राहक व घर विकत घेतले आहे अशा सुमारे पाच हजार ग्राहकांची गोपनीय माहिती कार्यालयातील संगणकामध्ये ठेवण्यात आली होती. ही माहिती कार्यालयातील दोन कामगारांनी चोरून मित्राच्या मदतीने खुल्या बाजारात विक्री केली. त्यामुळे काही बांधकाम कंपन्यांनी हा डेटा विकत घेऊन पॅराडाईज ग्रुपच्या ग्राहकांना त्यांच्या प्रकल्पाकडे आकर्षित करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पॅराडाईज ग्रुपच्या संपर्कात आलेले ग्राहक दुसऱ्या बांधकाम प्रकल्पाकडे जाऊ लागले. या प्रकाराची माहिती काही दलालांनी कंपनीच्या मालकांना दिल्यानंतर त्यांनी याबाबत खातरजमा केली.

पॅराडाईज ग्रुपच्या कार्यालयातील संगणकावरील गोपनीय माहिती संकलित करणारा धनिश फुलसुंगे व डोंबिवली येथील कर्मचारी अभिषेक सोनावले व त्यांचा मित्र सूरज उकीनकर या तिघांनी चोरी केल्याचे आढळून आले. त्यानंतर या कंपनीचे प्रतिनिधी जितेंद्र रावलानी यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89763 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top