ऑलिम्पिकच्या धर्तीवर जलतरण तलाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑलिम्पिकच्या धर्तीवर जलतरण तलाव
ऑलिम्पिकच्या धर्तीवर जलतरण तलाव

ऑलिम्पिकच्या धर्तीवर जलतरण तलाव

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : नेरूळ जिमखानामध्ये अत्याधुनिक ऑलिंपिकच्या धर्तीवर ५० मीटर लांबीचा जलतरण तलाव बांधण्यात येणार असून त्‍याचे भूमिपूजन रविवार, २४ जुलै रोजी गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, १९८३ च्या क्रिकेट वर्ल्डकप विजेत्या टीममधील खेळाडू बलविंदरसिंग संधू तसेच छत्रपती पुरस्‍कार विजेते जलतरणपटू उपस्थित राहणार आहेत.
जलतरण खेळाचा विकास आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने त्याच दिवशी १० आणि १२ वर्षाखालील मुला-मुलींसाठी सकाळी ८ वाजल्यापासून सहावी नेरूळ जिमखाना जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित केली आहे.
नेरूळ जिमखाना येथे असलेल्या १६ मीटर लांबीच्या जलतरण तलावात एकूण ३२ प्रकारच्या गटामध्ये ही स्पर्धा होणार आहे. नवी मुंबईतील जलतरण विश्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावरील खेळाडू घडविण्यासाठी ही सुविधा लाभदायक ठरणार असल्याचे नेरूळ जिमखानाचे मानद सचिव विकास शेट्टी यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89771 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top