गौरी गणपतीसाठी बदलापुरातून ज्यादा एसटी बस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गौरी गणपतीसाठी बदलापुरातून ज्यादा एसटी बस
गौरी गणपतीसाठी बदलापुरातून ज्यादा एसटी बस

गौरी गणपतीसाठी बदलापुरातून ज्यादा एसटी बस

sakal_logo
By

बदलापूर, ता. २१ (बातमीदार ) : मुंबई, उपनगर येथे नोकरीसाठी असणाऱ्या कोकणातील बदलापूरवासियांना मनसे बदलापूर शहर कार्यकारिणीच्या वतीने गौरी गणपतीसाठी, विशेष एसटी गाड्यांची सोय करून देण्यात आली आहे. यामुळे गौरी गणपतीवेळी रेल्वे व इतर गाड्यांचे आरक्षण मिळत नसल्याने होणारा त्रास कमी होणार आहे.
बदलापूर मनसेकडून बदलापुरात राहणाऱ्या मूळ कोकणवासीय असलेल्या नागरिकांसाठी ज्यादा एसटी बसची व्यवस्था करण्यात आली असून, बदलापूर ते कुडाळ, बदलापूर ते गुहागर, बदलापूर ते दापोली, बदलापूर ते साखरपा अशा चार मार्गांवर एसटीची व्यवस्था करण्यात आली आहे. या गाड्या साधारण गौरी गणपतीच्या एक आठवडा आधी सुरू होतील. या गाड्यांचे आरक्षण श्रीकृष्ण टूर्स अँड ट्रॅव्हल्स, बदलापूर येथून करण्याची सुविधा देण्यात आल्याचे यावेळी मनसे अध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी सांगितले. तसेच आरक्षणाचे दर सुद्धा सर्वसामान्यांना परवडतील अशाच दरात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89796 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..