
महावितरणच्या कार्यालयावर राष्ट्रवादीची धडक
बदलापूर, ता. २१ (बातमीदार ): अनियमित वीज पुरवठा, सतत भारनियमन, कमी दाबाने वीज पुरवठा, महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा व त्यांचा अंसवेदनशीलपणा, तक्रार करताना सामान्य नागरिकांना मिळणारी उद्धट वागणूक याला वैतागून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलापूरच्या वतीने, महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला. यावेळी कार्यकर्ते व पोलिसांमध्ये हमरातुमरी होऊन बाचाबाची झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात बदलापूर पश्चिम येथील महावितरण कार्यालयाचे मुख्य अभियंता मनोज कराड यांची भेट घेत, महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात जाब विचारण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस जिंदाबादच्या घोषणा देत, सामान्य नागरिकांच्या समस्येला वाचा फोडण्याचे काम राष्ट्रवादीकडून करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी बदलापूर पश्चिम पोलिसांनी केलेल्या कारवाईत कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वाद झाले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89798 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..