
माझी केडीएमसी माझा अभिमान
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ : काय तो पाऊस... काय ते खड्डे आणि किती तो टॅक्स... केडीएमसी ओके मध्ये... माझी केडीएमसी माझा अभिमान असे म्हणत एका तरुणाने कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांवरून एक व्हिडीओ तयार केला आहे. चक्क खड्ड्यांत पोहत त्याने प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. हा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत असून, खड्ड्यांवरून नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांवरून स्थानिक नागरिक वारंवार प्रशासनाला लक्ष्य करीत असतानादेखील येथील परिस्थिती सुधारत नसल्याची प्रतिक्रीया नागरिक व्यक्त करीत आहेत.
कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची पावसाळ्यात दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डे बुजवण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरू आहे, परंतु अद्यापही अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे जैसे थे आहेत. यावरून आता शहरातील तरुणांनी समाज माध्यमावर मिम्स, कार्टून्सच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. एका तरुणाने खड्ड्यात पोहण्याचा व्हिडीओ बनवला असून, हा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे पाण्यात पोहण्यास शिकलो आहे, असे म्हणत हा तरुण चक्क गाळाच्या पाण्यात पोहत आहे. तसेच काय तो पाऊस, काय ते खड्डे आणि किती तो टॅक्स... केडीएमसी ओके मध्ये... माझी केडीएमसी माझा अभिमान असे म्हणत त्याने प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. पालिका प्रशासन आता तरी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणार का, हे पाहावे लागणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89801 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..