ठाण्यात धावत्या कंटेनरला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात धावत्या कंटेनरला आग
ठाण्यात धावत्या कंटेनरला आग

ठाण्यात धावत्या कंटेनरला आग

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा,
ठाणे, ता. २१ : मुंबई येथून गुजरात अहमदनगर येथे निघालेल्या कंटेनरला मुंबई-नाशिक महामार्गावरील तीन हात नाका परिसरात आग लागल्याची घटना गुरुवारी साडेसात वाजण्याच्या समोर आली. वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. तर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी तातडीने तो कंटेनर रस्त्याच्या एका बाजूला करून ती वाहिनी वाहतुकीसाठी मोकळी करून दिली, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
कंटेनर चालक सुरेश कुमार हा कंटेनर घेऊन गुरुवारी सकाळीच मुंबईतून ठाणेमार्गे गुजरात येथे निघाला होता. तो कंटेनर तीन हात नाक्यावरून पुढे घेऊन गेल्‍यावर कंटेनरच्या चालक केबिनच्या मागील बाजूला आग लागली. या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानंतर घटनास्थळी वाहतूक पोलिस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. या घटनेत कोणलाही दुखापत झालेली नाही. तो कंटेनर हायड्राच्या साहायाने रस्त्याच्या एका बाजूला करून ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सर्व वाहनांसाठी मोकळा करण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89802 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..