मुख्य न्यायमूर्तींच्या नावे फसवणूक करणारा गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्य न्यायमूर्तींच्या नावे 
फसवणूक करणारा गजाआड
मुख्य न्यायमूर्तींच्या नावे फसवणूक करणारा गजाआड

मुख्य न्यायमूर्तींच्या नावे फसवणूक करणारा गजाआड

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असल्याचे सांगत फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. मैकुलाल चंदन दिवाकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील बरेलीचा रहिवासी आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता अशी स्वतःची ओळख सांगत आरोपीने ऑनलाईन कंपनीचे गिफ्ट कार्ड विकत घेण्याचा आग्रह करत उच्च न्यायालयातील उपनिबंधकांना फसवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तक्रारदार दिलीप कुलकर्णी यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. कुलकर्णी यांना २५ जून रोजी एका अनोळखी मोबाईलवरून कॉल आला. त्या मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये ‘मा. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता’ असे नाव नमूद केले होते आणि डीपीही दत्ता यांचाच होता. प्राथमिक संभाषणानुसार कुलकर्णी यांना समोरील व्यक्ती मुख्य न्यायमूर्तीच बोलत असल्याचा विश्वास बसला. त्यानंतर कुलकर्णी यांना अ‍ॅमेझॉन गिफ्ट पे कार्डसबाबत माहिती आहे का, याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांना संशय आला. कुलकर्णी यांनी लगेच न्यायमूर्तींच्या कार्यालयात फोन करत विचारणा केली असता असा कॉल केला नसल्याचे समजले. अखेर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89806 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top