विश्वास संपादन करत तरूणांचा ज्येष्ठ नागरिकाला २२ लाखांचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विश्वास संपादन करत तरूणांचा
ज्येष्ठ नागरिकाला २२ लाखांचा गंडा
विश्वास संपादन करत तरूणांचा ज्येष्ठ नागरिकाला २२ लाखांचा गंडा

विश्वास संपादन करत तरूणांचा ज्येष्ठ नागरिकाला २२ लाखांचा गंडा

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : बेस्ट उपक्रमातून सेवानिवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला व्हिडीओ गेम खेळण्याच्या बहाण्याने लूटल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडितेच्या बँक खात्यातून गुगल पेद्वारे २२ लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यात वळवले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. शुभम तिवारी (वय २२) आणि अमर गुप्ता (वय २८) अशी आरोपींची नावे आहेत.
गोरेगाव पूर्व येथील प्रकाश नाईक हे बेस्टमधून सेवानिवृत्त झाले आहेत. ते दिंडोशी बस डेपोजवळ नियमित फेरफटका मारायला जातात. एकेदिवशी नाईक यांची दोन अनोळखी तरुणांशी ओळख झाली. हळूहळू परिचय वाढवत त्यांनी नाईक यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी नाईक यांना व्हिडीओ गेम खेळण्यासाठी मोबाईल मागीतला. हा प्रकार काही दिवस सतत सुरू होता. एकेदिवशी आरोपींनी त्यांच्या मोबाईलमध्ये गुगल पे डाऊनलोड केले. त्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने तब्बल २२ लाख रुपये काढले. आपल्या खात्यातून पैसे कमी झाल्याची बाब लक्षात आल्याने नाईक खात्याची माहिती घेण्यासाठी बँकेत पोहोचले. त्या वेळी गुगल पेद्वारे बँक खात्यातून २२ लाख रुपये काढल्याचे समजताच त्यांना धक्का बसला.
प्रकाश नाईक यांनी तातडीने दिंडोशी पोलिस ठाणे गाठत रीतसर तक्रा दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आणि बँक खात्यावरील व्यवहाराची पडताळणी करत शुभम तिवारी आणि अमर गुप्ता यांना अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89807 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..