मुंबई : मानसिक आजारी असलेल्या मुलीची आईनेच केली हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news
आईनेच केली मुलीचा हत्या!

मुंबई : मानसिक आजारी असलेल्या मुलीची आईनेच केली हत्या

मुंबई : मुलीची हत्या करून तिला फासावर चढवल्याची धक्कादायक घटना अंधेरीतील पारशीवाडा भागात घडली आहे. आईनेच मुलीचा गळा दाबत हत्या करून नंतर तिला फासावर चढवत आत्महत्येचा बनावा रचला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिने सांगितलेल्या या खोट्या माहितीचा उलगडा मुलीच्या शवविच्छेदनातून झाला.

मानसिक आजारी असलेल्या मुलीची तिच्या आईने गळा दाबून हत्या केली. नंतर स्वत:चा गुन्हा लपवण्यासाठी या क्रूर महिलेने मुलीच्या मृतदेहाला फासावर लटकवले. सुरुवातीला पोलिसांना मुलीने आत्महत्या केली नसल्याचा संशय आला होता. अखेर शवविच्छेदन अहवाल येताच पोलिसांचा संशय खरा ठरला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मृत मुलीच्या आईने खून केल्याचा गुन्हा मान्य केला. आरोपी महिलेविरुद्ध कलम ३०२ अंतर्गत अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89808 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai Newscrime