
मध्य रेल्वेकडून ७४५ मुलांची घरवापसी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत गेल्या सहा महिन्यांत ७४५ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ४९० मुले आणि २५५ मुलींचा समावेश आहे. या मोहिमेसाठी आरपीएफला चाईल्डलाईन स्वयंसेवी संस्थेची मदत झाली आहे.
रेल्वे सुरक्षा बलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत हरवलेल्या/ घरातून पळून आलेल्या मुलांच्या सुटकेसाठी इतर यंत्रणा आणि संस्थांच्या मदतीने आरपीएफ काम करत आहे. देशभरातील अनेक मुले मुंबईचे आकर्षण, कौटुंबिक कलह, भांडण तसेच चांगल्या आयुष्याच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता मुंबईत येतात. रेल्वे स्थानकांवर ही मुले आरपीएफ कर्मचाऱ्यांना सापडतात. प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी या मुलांच्या अडचणी समजून घेतात आणि त्यांना पालकांकडे जाण्याचा सल्ला देतात.
कोणत्या भागात किती मुले?
विभाग मुले मुली एकूण
मुंबई २७० १११ ३८१
भुसावळ ७२ ६६ १३८
नागपूर ३० २६ ५६
पुणे ९८ ३८ १३६
सोलापूर २० १४ ३४
मध्य रेल्वे पळून गेलेल्या मुलांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या समजून घेते. आरपीएफ आणि फ्रंटलाईन कर्मचारी या प्रकरणातील गांभीर्य ओळखून आणि समुपदेशक म्हणून त्वरित कार्यवाही करतात.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89814 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..