प्रफुल्ल पटेल यांचे मुंबईतील घर जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रफुल्ल पटेल यांचे मुंबईतील घर जप्त
प्रफुल्ल पटेल यांचे मुंबईतील घर जप्त

प्रफुल्ल पटेल यांचे मुंबईतील घर जप्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आता ईडीच्या रडारवर आहेत. इक्बाल मिर्चीसोबत झालेल्या व्यवहाराप्रकरणी ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. वरळी येथील प्लॉट खरेदीप्रकरणी मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप पटेल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार पटेल यांचे वरळी येथील सीजी हाऊसमधील घर जप्त करण्यात आले आहे.
पटेल यांची इक्बाल मिर्ची प्रकरणात मागील काही दिवसांपासून चौकशी सुरू आहे. पटेल आणि त्यांचे कुटुंब हा फ्लॅट सध्या वापरू शकणार आहेत; मात्र त्यांची विक्री ईडीच्या परवानगीशिवाय त्यांना करता येणार नाही. इक्बाल मिर्ची याने हा प्लॅट खरेदी केला होता आणि त्यानंतर एका विकसकाने हा प्लॅट विकसित केल्यानंतर त्यातील काही सदनिका पटेल यांना विकल्या. या व्यवहारात मनी लाँडरिंग करण्यात आल्याचा आरोप आहे. ईडीने याआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली आहे. आता प्रफुल्ल पटेल यांच्यावरही कारवाई झाल्याने कारवाई झालेले पटेल हे राष्ट्रवादीचे तिसरे नेते ठरले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89816 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..