हरवलेली इलेक्ट्रिक दुचाकी विहिरीत आढळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरवलेली इलेक्ट्रिक दुचाकी विहिरीत आढळली
हरवलेली इलेक्ट्रिक दुचाकी विहिरीत आढळली

हरवलेली इलेक्ट्रिक दुचाकी विहिरीत आढळली

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २१ ः कल्याणजवळील वसार गावात राहणारे बारकू वायले यांची इलेक्ट्रिक दुचाकी मंगळवारी गायब झाली होती. वाहन हरवल्याची तक्रार वायले यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात नोंदवली होती. वसार गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला शेतात शोध घेतला असता शेतातील विहिरीत दुचाकी आढळून आली. विहिरीतून ही दुचाकी बाहेर काढण्यात आली असून हा खोडसाळपणा कोणी केला याचा शोध पोलिस घेत आहेत.

वसार गावात राहणाऱ्या बारकू यांची इलेक्ट्रिक दुचाकी मंगळवारपासून बेपत्ता झाली होती. आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही दुचाकी न सापडल्याने त्यांनी दुचाकी बेपत्ता झाल्याची तक्रार हिललाईन पोलिस ठाण्यात नोंदवली होती. भाल गावाकडून वसार गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला तसेच शेतात दुचाकीचे मेंट दिसून आल्याने तेथील विहिरीत तरुणांनी डोकावले असता विहिरीत दुचाकी टाकल्याचा त्यांना संशय आला. काही तरुणांनी विहिरीत उड्या घेत दुचाकीचा शोध घेतला असता त्यांना दुचाकी आढळून आली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी एक तासाच्या प्रयत्नांनंतर पोलिसांच्या मदतीने विहिरीतून दुचाकी बाहेर काढण्यात आली. सध्या ही दुचाकी पोलिसांच्या ताब्यात असून खोडसाळपणे कोणी तरी हे कृत्य केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89819 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top