साडेचार महिन्यांच्या मरियमला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडेचार महिन्यांच्या मरियमला जीवदान
साडेचार महिन्यांच्या मरियमला जीवदान

साडेचार महिन्यांच्या मरियमला जीवदान

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : टायरोसिनिमी या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या साडेचार महिन्यांच्या मरियमवर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. परळच्या ग्लोबल
रुग्णालयात प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
साडेचार महिन्यांच्या मरियमची इतर मुलांसारखीच वाढ होत होती, पण तोपर्यंत त्याला टायरोसिनिमियाचे निदान झाले नव्हते; मात्र प्रकृतीमध्ये वारंवार तक्रारी येत असल्याने पालकांनी त्याला रुग्णालयात आणले. तपासणीदरम्यान मरियमला टायरोसिनिमी हा दुर्मिळ रोग झाल्याची माहिती समोर आली. लाखांत एकाला होणाऱ्या या अनुवांशिक आजारामुळे मूल जन्माला येताच यकृत निकामी होते. त्यामुळे प्रत्यारोपणाशिवाय काही पर्याय नसल्याने परळच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
---
दुर्मिळ चयापचयाचा यकृत रोग असलेल्या टायरोसिनिमीचे वेळेत निदान झाल्यास योग्य उपचार होऊ शकतात. भारतात या बाल यकृत रोगांचे निदान करण्यासाठी सुविधा केंद्र तसेच तज्ज्ञ उपलब्ध आहेत.
- डॉ. आरती पवारिया, वरिष्ठ सल्लागार, ग्लोबल रुग्णालय

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89857 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top