मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन मेगाब्लॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेवर आज
रात्रकालीन मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन मेगाब्लॉक

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेबाबतची तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रीपासून ते रविवारी पहाटेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याशिवाय पश्चिम आणि हार्बर मार्गावरही रविवारी नियमित मेगाब्लॉग असणार आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉकला नसणार आहे.
---
मध्य रेल्वे
कुठे- भायखळा ते माटुंगा अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी- शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ५.४० वाजेपर्यंत
परिणाम- ब्लॉक काळात सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा भायखळा आणि माटुंगादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. त्यामुळे या मार्गावरील लोकल नियमित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. तसेच ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि भायखळादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. विशेष म्हणजे या ब्लॉक कालावधीत जनशताब्दी एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, कोणार्क एक्स्प्रेससारख्या लांब पल्ल्याच्या गाड्या डाऊन मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
---
हार्बर रेल्वे
कुठे- पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप-डाऊन मार्गावर
कधी- सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम- या ब्लॉकदरम्यान पनवेल ते सीएसएमटी अप-डाऊन मार्गावरील लोकल बंद राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर-खारकोपर आणि नेरूळ-खारकोपरदरम्यानच्या लोकल वेळापत्रकानुसार धावतील. तसेच सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील.
---
पश्चिम रेल्वे
कुठे- सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावर
कधी- सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
परिणाम- या ब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. तसेच ब्लॉक कालावधीत डाऊन मार्गावरील काही गाड्या रद्द असणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89859 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..